दिव्यांगांसाठी एकदाच नोंदणी पेन्शन, शिष्यवृत्ती, घरकुल सगळ्या योजना एकाच ठिकाणाहून महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी एक नवीन पोर्टल सुरू केलं आहे divyangsahayak.maharashtra.gov.in. या पोर्टलवर एकदा नोंदणी केली की पेन्शन, शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री आवास योजना, सहाय योजना, गुणवत्ता पुरस्कार अशा डझनभर योजनांसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येतो. वारंवार कार्यालयात जाण्याची गरज नाही. या लेखात UDID Card वापरून नोंदणी कशी करायची, कोणती माहिती भरायची, कोणती माहिती सक्तीची आहे आणि नोंदणीनंतर योजनांसाठी अर्ज कसा करायचा हे सगळं सविस्तर सांगितलं आहे.
हे पोर्टल का महत्त्वाचं आहे?
आधी दिव्यांग व्यक्तींना प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या कार्यालयात जावं लागायचं. पेन्शनसाठी एक ठिकाण, शिष्यवृत्तीसाठी दुसरं, घरकुलसाठी तिसरं. प्रत्येक ठिकाणी कागदपत्रे, रांगा, वेळ. हे सगळं थकवणारं होतं. आता महाराष्ट्र सरकारने एकच पोर्टल तयार केलं आहे. तिथे एकदा नोंदणी केली की सगळ्या योजना एकाच ठिकाणाहून दिसतात आणि अर्ज करता येतो. नोंदणी एकदाच करायची असते पुन्हा करायची गरज नाही. मोबाईल असेल तर घरबसल्या हे सगळं होतं.
दिव्यांग बांधवांसाठी मोठी संधी! तहसील आणि पंचायत समिती परिसरात मिळणार व्यवसायासाठी 200 चौरस फूट जागा
नोंदणीसाठी काय लागतं?
नोंदणी करण्यापूर्वी काही गोष्टी तयार ठेवा. UDID Card म्हणजे Unique Disability Identity Card हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे MH ने सुरू होणारं कार्ड असतं. त्याशिवाय आधार कार्ड लागतं. बँक खाते असणं आवश्यक आहे खाते क्रमांक आणि IFSC Code लागेल. UDID Card ला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे तो नंबर जवळ असायला हवा कारण OTP त्यावरच येतो. जन्मतारीख माहीत असणं गरजेचं आहे. बाकी माहिती नाव, पत्ता आधार कार्डाप्रमाणे आपोआप येते.
वेबसाईटवर कसं जायचं आणि नोंदणी कशी सुरू करायची?
मोबाईल किंवा लॅपटॉप उघडा. ब्राउजरमध्ये divyangsahayak.maharashtra.gov.in ही वेबसाईट उघडा. उघडल्यावर “नोंदणी दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यावर एक प्रश्न येतो “तुमच्याकडे UDID Card आहे का?” यावर “होय, माझ्याकडे UDID Card आहे” हा पर्याय निवडायचा. जर UDID Card नसेल तर आधी ते काढावं लागेल त्याशिवाय या पोर्टलवर नोंदणी होत नाही.
UDID Number टाकायचा हा MH ने सुरू होणारा पूर्ण नंबर असतो. त्यानंतर जन्मतारीख निवडायची. मग “OTP पाठवा” वर क्लिक करायचं. UDID Card ला जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP येतो. तो OTP टाकून “OTP तपासा” वर क्लिक करायचं. हिरव्या रंगाचं “सत्यापित करा” बटन दिसेल, त्यावर क्लिक केलं की पुढची प्रक्रिया सुरू होते.
वैयक्तिक माहिती काय भरायचं आणि काय आपोआप येतं?
OTP Verify झाल्यावर एक मोठा फॉर्म उघडतो. घाबरू नका बरीच माहिती आपोआप भरली जाते, तुम्हाला फक्त काही भाग भरायचा आहे. फॉर्ममध्ये जिथे Star (*) दिसतो ती माहिती सक्तीची आहे ती सोडता येत नाही. बाकी माहिती असेल तर भरा, नाहीतर सोडता येते.
घरकुल यादी ऑनलाइन कशी चेक करावी? गावानुसार लाभार्थी यादी, हप्ते आणि मंजूर रक्कम पाहण्याची नवीन पद्धत
पहिल्या भागात आधार नंबर टाकायचा. त्यासाठी एक checkbox असतो “माझ्याकडे आधार नंबर आहे” यावर tick करायचं आणि खालच्या box मध्ये आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकला की नाव, आडनाव, लिंग, जन्मतारीख, वय आणि मोबाईल नंबर आपोआप येतात. Email ID मात्र तुम्हाला स्वतः टाकायचा असतो तो नसेल तर सोडता येतो, Star नसेल तर. वैवाहिक स्थिती निवडायची विवाहित, अविवाहित, घटस्फोटित यापैकी जे लागू होतं ते.
कुटुंबाची माहिती वडील आणि आई
वैयक्तिक माहितीनंतर कुटुंबाची माहिती विचारली जाते. वडिलांचं पहिलं नाव आधारप्रमाणे आपोआप येतं. मधलं नाव आणि आडनाव तुम्हाला टाकायचं असतं. “वडील दिव्यांग आहेत का?” असा प्रश्न विचारला जातो. असतील तर “होय” निवडा आणि त्यांचा UDID Number किंवा अपंगत्व प्रमाणपत्र क्रमांक टाका. नसतील तर “नाही” करा. त्याचप्रमाणे आईचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं. आई दिव्यांग असेल तर त्यांचाही नंबर द्यायचा.
लग्न झालेलं असेल तर Spouse Details म्हणजे पती किंवा पत्नीची माहिती भरायची. पूर्ण नाव, जन्मतारीख आणि ते दिव्यांग आहेत का हे सांगायचं. हे mandatory नाही Star नसेल तर सोडता येतं. लग्न झालेलं नसेल तर हा भाग सोडून पुढे जायचं.
स्थिती माहिती आणि पत्ता
“अधिवास प्रमाणपत्र आहे का?” यावर महाराष्ट्रात राहत असाल तर “होय” करायचं. PAN Card असेल तर नंबर टाका, नसेल तर सोडा. दिव्यांग स्थिती म्हणजे कशात अपंगत्व आहे, किती टक्के आहे हे UDID Card वरून आपोआप येतं, तुम्हाला काही टाकायची गरज नाही.
बकरी पालनासाठी 50% ते 90% अनुदान: पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
पत्त्यासाठी आधार कार्डवरचा पत्ता वापरा. घर क्रमांक, इमारत, रस्ता टाकायचं. जिल्हा, तालुका, गाव आणि स्थानिक संस्था निवडायची. “स्थायी पत्ता हाच आहे का?” असा प्रश्न येतो हो असेल तर “होय” करा, वेगळा असेल तर “नाही” करून तो टाका.
शिक्षण, व्यवसाय आणि उत्पन्न
शिक्षणाचा भाग येतो कितवी शिक्षण झाली ते सांगायचं. हे Star असेल तर द्यायचंच. व्यवसाय करत असाल तर तो सांगता येतो, नाही माहीत तर सोडता येतं. वार्षिक उत्पन्न नसेल तर शून्य टाका. पालकांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न विचारलं जातं ते असेल ते सांगा.
पालक नसतील म्हणजे आई-वडील दोन्ही नसतील तर “पालकांशिवाय कायदेशीर पालक आहेत का?” या checkbox वर tick करायचं आणि जे कोणी सांभाळत असतील त्यांची माहिती द्यायची. आई-वडील असतील तर हा box tick करायचा नाही.
बँक खात्याची माहिती हे महत्त्वाचं आहे
बँक खात्याची माहिती नीट भरायची. खाते क्रमांक टाकायचा. IFSC Code अचूक टाकायचा चुकला तर पैसे दुसऱ्या खात्यात जाऊ शकतात. बँकेचं नाव टाकायचं. खातेदाराचं नाव म्हणजे दिव्यांग व्यक्तीचंच नाव आपोआप येतं. हे खातं Aadhar linked आणि DBT enabled असणं चांगलं म्हणजे सरकारी पैसे थेट खात्यात येतात.
आयुष्मान भारत योजनेचे कार्ड घरबसल्या कसे काढायचे? मोबाईलवरून संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या
इतर माहिती आणि काळजीवाहक
“दारिद्र्यरेषेखाली आहात का?” पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर “होय” करा. “आर्थिक दुर्बल घटकात येता का?” येत असाल तर “होय” करा. या दोन प्रश्नांची उत्तरं योजना मिळण्यात फरक करतात, त्यामुळे नीट विचार करून उत्तर द्या.
दिव्यांग व्यक्तीची काळजी घेणारी वेगळी व्यक्ती असेल तर त्यांचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर आणि नातं सांगायचं भाऊ, बहीण, मुलगा, नातेवाईक असेल ते. NGO किंवा संस्थेत राहत असाल तर त्या box वर tick करून संस्थेचं नाव, नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती द्यायची. संस्थेत राहत नसाल तर तो box tick करायचा नाही.
Submit करण्यापूर्वी एकदा तपासा
सगळी माहिती भरून झाल्यावर खाली एक checkbox आणि Submit बटन दिसतं. Submit करण्यापूर्वी एकदा वरून खाली सगळं नजरेखालून घाला. कारण Submit केल्यावर बदल करता येत नाहीत पोर्टल स्वतःच सांगतं की “Submit केल्यानंतर बदल करता येणार नाहीत.” checkbox वर tick करा आणि Submit वर क्लिक करा. “Congratulations Registration Successfully” असा संदेश येईल. नोंदणी पूर्ण झाली.
नोंदणीनंतर Login कसं करायचं?
नोंदणी झाल्यावर Login करायचं. मोबाईल नंबर टाकायचा आणि “OTP पाठवा” वर क्लिक करायचं. OTP आल्यावर तो टाकून “Sign In” करायचं. Dashboard उघडेल तिथे तुमची सगळी माहिती दिसेल.
कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज करता येतो?
Login केल्यावर डाव्या बाजूला “पात्र योजना” असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की तुम्ही ज्या योजनांसाठी पात्र आहात त्या सगळ्या एकत्र दिसतात. दिव्यांग पेन्शन योजना, सहाय योजना, शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता पुरस्कार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना आणि बरंच काही या सगळ्या योजनांचे अर्ज इथूनच होतात. एकदा नोंदणी, अनेक योजना हे या पोर्टलचं खरं सामर्थ्य आहे.
ज्या दिव्यांग व्यक्तींनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी आजच करायला हवी. ही माहिती घरातील दिव्यांग व्यक्तींना आणि ओळखीच्यांना सांगा कारण अनेकांना या योजना असतात हेच माहीत नसतं
नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात, शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा
दिव्यांग एकदाच ऑनलाइन नोंदणी – महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे (FAQ)
1. दिव्यांगांसाठी नवीन काय सुविधा सुरू झाली आहे?
उत्तर: महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी “एकदाच ऑनलाइन नोंदणी” सुविधा सुरू केली आहे. या नोंदणीनंतर विविध सरकारी योजनांसाठी एकाच पोर्टलवरून अर्ज करता येतो.
2. ही नोंदणी कोणाला करता येईल?
उत्तर: महाराष्ट्रातील पात्र दिव्यांग व्यक्ती ज्यांच्याकडे UDID (Unique Disability ID) कार्ड आहे, त्या सर्वांना ही नोंदणी करता येईल.
3. नोंदणी करण्यासाठी कोणत्या वेबसाइटवर जावे लागेल?
उत्तर: दिव्यांग सहाय्यक पोर्टल, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येते.
4. नोंदणीसाठी कोणते कार्ड आवश्यक आहे?
उत्तर: UDID कार्ड आवश्यक आहे. त्यावरील MH ने सुरू होणारा UDID क्रमांक नोंदणीवेळी भरावा लागतो.
5. OTP कोणत्या मोबाईल क्रमांकावर येतो?
उत्तर: UDID कार्डसोबत नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जातो.
6. आधार कार्ड आवश्यक आहे का?
उत्तर: होय. आधार क्रमांक भरल्यानंतर काही वैयक्तिक माहिती आपोआप भरली जाते.
7. कोणती वैयक्तिक माहिती भरावी लागते?
उत्तर: नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी (असल्यास) आणि वैवाहिक स्थिती यांसारखी माहिती भरावी लागते.
8. कुटुंबाची कोणती माहिती द्यावी लागते?
उत्तर: वडील आणि आईचे नाव, तसेच ते दिव्यांग असल्यास त्यांचा UDID क्रमांक भरावा लागतो.
9. विवाहित व्यक्तींनी कोणती माहिती भरावी?
उत्तर: पती किंवा पत्नीचे नाव, जन्मतारीख आणि ते दिव्यांग आहेत की नाही, ही माहिती भरता येते.
10. दिव्यांग स्थितीची माहिती पुन्हा भरावी लागते का?
उत्तर: नाही. UDID पडताळणीनंतर दिव्यांगत्वाचा प्रकार आणि अपंगत्वाची टक्केवारी आपोआप दिसते.
11. पत्ता कसा भरावा?
उत्तर: सध्याचा पत्ता भरावा. कायमचा पत्ता तोच असल्यास “होय” निवडावे, अन्यथा वेगळा पत्ता भरावा.